बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील सर्वच व्यवसायांना कोरोनाचा फटका बसला आहे. दरम्यान बेंगळूर शहरातील आयटी क्षेत्रातील कर्मचारी ऑफिसमध्ये नसल्याने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंट्सच्या व्यवसाय फटका बसला आहे. याकडे लक्ष वेधून बृह बेंगळूर हॉटेल्स असोसिएशनने (बीबीएएचए) शहरातील कर्नाटक सरकारला शहरातील आयटी कंपन्यांना पुन्हा कार्यालयातून काम करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.
बीबीएचएचे अध्यक्ष पी. सी. राव यांनी कोरोनामुळे लॉकडाउन आणि इतर संबंधित निर्बंध सुरू झाल्यापासून शहरातील १२ हजार आयटी कंपन्या कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. सर्व कंपन्या सर्वच कर्मचाऱ्यांना अद्याप घरातूनच काम करण्यास परवानगी देत असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना फटका बसला आहे.
हॉटेल, हाऊस कीपिंग, मेंटेनन्स, फूड कोर्ट, ट्रॅव्हल्स, केटरिंग या सर्व बाबींचा परिणाम आयटी कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे यासर्व घटकांवर कंपन्यांचे घरातून काम सुरु असल्याने नुकसान होत आहे. असोसिएशनने सरकारला विनंती केली आहे की हळूहळू घरातून काम करण्यास बंद करून त्यांना कोरोना सुरक्षा उपायांसह कार्यालयातून कार्य करण्याची परवानगी द्या, अशी मागणीकेली आहे.