प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटू व खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी तुषार गणपत कांबळे (वय 16) याचा शुक्रवारी सकाळी धावताना ह्रदयावर ताण वाढल्याने दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने पालकांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. अनुवंशिकता, मुलांना ह्य्दयाचे असणारे आजार यामुळे लहान वयात ह्य्दय विकाराचा झटका येण्याची कारणे प्रख्यात हदयरोग तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहेत.
मूळचा सातारा तालुक्यातील अतितचा रहिवासी असलेला तुषार हा नवोदयमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होताच, पण खेळामध्येही त्याने नाव कमावले होते. त्याचा फिटनेस उत्तम होता. बास्केटबॉलमध्ये विद्यालयाच्या संघातून गोव्यात तसेच गुजरातमध्ये जामनगरला त्याने चमकदार कामगिरी केली होती. एनडीएला जाण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याद्दष्टीने तो चिकाटीने अभ्यास व सराव करत होता. दरम्यान, तुषार हा शुक्रवारी सकाळी सात वाजता चुलत भावासमवेत रनिंगसाठी बाहेर पडला. दोघेही धावू लागले. मात्र तुषार हा धावता धावता खाली कोसळला. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाने त्याला दुचाकीवरून नागठाणे येथे नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने खेळाडुसह त्यांच्या पालकांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. वयोवृद्ध तसेच ह्रदय विकाराच्या आजाराने त्रस्त लोकांच्या मृत्यूची कारणे लवकर समोर येतात. मात्र कमी वयात मुलांना येणारे ह्रदय विकाराचे झटके विचार करायला भाग पाडतात. ज्यांचे ह्य्दयावर स्थानु जाड असतात. घरात कमी वयात मृत्यू ची घटना घडलेली असते. याला अनुवंशिकता ही म्हणता येईल. अशी कारणे जबाबदार असतात. यासाठी पालकांनी मुलांच्या ह्य्दयाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तपासणीत ह्रदयाचे आजार असल्यास निदर्शनास आल्यास प्रसंगी उपचार करून जीव वाचवता येऊ शकतो असे डॉ. साबळे यांनी सांगितले.