बेंगळूर : सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी आयबीएमने येणाऱया काळात भारतात 500 जणांना नोकरीची संधी देण्याचे मान्य केले आहे. आयबीएम ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मानली जाते जी 11 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीची आहे, असे संगितले जाते. भारतात आयबीएम कंपनीत अंदाजे 3 लाख 50 हजारहून अधिकजण काम करतात, असंही सांगण्यात येतं.
अमेरिकेपेक्षाही भारतातील कंपनीची कर्मचारी संख्या जास्त आहे. येणाऱया काळात मॅनेजर्स, ऍडमिनिस्ट्रेटर्स, डाटा सायंटीस्ट, नेटवर्क आर्किटेक्ट अशा विविध पदांवर कर्मचाऱयांची भरती कंपनीकडून होणार आहे.