आयर्लंडच्या मीथ काउंटीमध्ये तारा हिल नावाचे ठिकाण आहे. याच भागात दगडी विटांनी शिवलिंगासारखी एक आकृती तयार करण्यात आली होती. ही आकृती नेमकी कधी तयार करण्यात याबद्दल लोकांना निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. पण तेथील लोक याला रहस्यमय दगडाच्या स्वरुपात ओळखताला त्याला लिआ फेइल (भाग्याचा दगड) म्हटले जाते आणि लोक याची पूजा करतात.
1632-1636 दरम्यान प्रेंच भिक्षूंचा एक प्राचीन दस्तऐवज ‘द मायनर्स ऑफ द फोर मास्टर्स’नुसार काही विशेष जादूई शक्ती बाळगणाऱया एका गटाचे म्होरके तुथा डि देनन यांनी याची निर्मिती केली होती. तर काही वैज्ञानिकांच्या अनुमानानुसार आयर्लंडमध्ये कांस्य धातूची निर्मिती याच गटातील लोकांनी सुरू केली होती.
तुथा डि देननचा अर्थ दानू देवीची मुले असा होता. या देवीने 1897 ख्रिस्तपूर्व ते 1700 ख्रिस्तपूर्वपर्यंत आयर्लंडवर शासन केले होते. ख्रिश्चन भिक्षूंनी दगडाला प्रजनन क्षमतेच्या प्रतीक मूर्तीच्या स्वरुपात पाहिले. या दगडाचा वापर पुढील काळात सर्व आयरिश राजांच्या राज्याभिषेकावेळी करण्यात आला होता.
युरोपीय परंपरेत दानू देवी एक नदी देवता होती. देन्यूबू, दोन डनीपर आणि डिनिएस्टर नद्याही याच्याशी संबंधित आहेत. काही आयरिश ग्रंथांमध्ये या देवीच्या पित्याला दागदा (सर्वात चांगला देव) म्हटले जाते. वैदिक परंपेरत दानू देवीचा उल्लेख आढळतो. संस्कृतमध्ये दानू शब्दाचा अर्थ ‘वाहणारे पाणी’ असा होतो.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये आयर्लंडमध्ये या शिवलिंगासारख्या आकृतीला नुकसान पोहोचविण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. जून 2012 मध्ये एका व्यक्तीने यावर 11 वेळा वार केले होते. मे 2014 मध्ये या आकृतीवर लाल तसेच हिरवा रंग ओतण्याचा प्रयत्न केला होता.