विद्यापीठ, संस्थांचे पत्र आवश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील आघाडीवरची आयसीआयसीआय बँक एक कोटीचे शैक्षणिक कर्ज तत्काळ मंजूर करण्याच्या तयारीत आहे. ही बँक इन्स्टा एज्युकेशन लोन नावाने कर्ज योजना सुरु करत असल्याची माहिती आहे. यासोबतच बँक ग्राहकांच्या मुले, भाऊ बहीण आणि अन्य नात्यांमधील लोकांनाही कर्ज योजना आणण्याची तयारी करते आहे. देश आणि जगभरातील विद्यापीठात अभ्यास करणाऱया प्री अप्रूक्ह ग्राहकांना ही कर्जाची सेवा मिळणार आहे.
सदरच्या सेवेचा लाभ हा बँकेच्या लाखो प्री अप्रूव्ह ग्राहकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या अंतर्गत उठवता येणार आहे. याच्यासाठी संबंधीत विद्यापीठ आणि संस्थांचे कर्ज मंजुरीचे पत्र सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन मंजुरी पत्र प्राप्त होणार
इस्टा एज्युकेशन लोन सुविधेच्या आधारे बँकेच्या ग्राहकांना ऑनलाईन मंजुरी पत्र सादर करणे आवश्यक आहे. या अगोदर या कामासाठी 2 ते 4 दिवस लागत होते. या सुविधेला सुरुवात केल्यानंतर बँकेत जाण्याची आवश्यकता नसून घरात बसूनच ही सर्व कामे ग्राहकांना पूर्ण करता येणार आहेत.