मुंबई
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतील आघाडीवरची कंपनी टेस्लाच्या आवाहनानंतर भारत सरकार आता आयात करात सवलत देण्याबाबत विचार करत असल्याचे समजते. आयातीत इलेक्ट्रिक वाहनांवरच्या आयात करात सवलतीची मागणी काही दिवसांपूर्वी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी केली होती. त्याबाबत आणखी एका कंपनीनेही याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान याबाबतीत सरकार विचार करत असून लवकरच यासंबंधी निर्णय होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. 40 हजार डॉलर्सपेक्षा कमी किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क कपात करण्याची मागणी मस्क यांनी केली आहे.