कोल इंडियाचे नियोजन : 8 कोटी टन कोळशाची आयात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी कोल इंडिया चालू आर्थिक वर्षात आठ ते साडेआठ कोटी टन आयात केला जाणारा कोळसा देशात पुरवठय़ासाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती आहे. यासाठी वर्षभरात कोल इंडिया देशातील अतिरीक्त कोळशाचा पुरवठा करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
कंपनी सागर किनारी प्रदेशात असणाऱया वीज प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करणार आहे. सदरचे प्रकल्प यातून येणाऱया महिन्यांमध्ये कोळसा पुरवठा किती वेगाने होणार आहे याचा प्रस्ताव कंपनीकडे सादर करणार आहे. यायोगे कोळसा आयातीवर होणाऱया विदेशी खर्चात बचत करता येणार आहे. प्रकल्पधारकांना कोळशाच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केलेले आहे.
चालू वर्षातील योजना
चालू वर्षात कोल इंडियाकडून आठ ते साडेआठ कोटी टन आयात होणाऱया कोळशाचा वापर देशातील विविध प्रकल्पांसाठी उपलब्ध करुन देण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार कोळशाचा पुरवठा केला जाणार आहे. 2019-20 मध्ये 24.80 कोटी टन कोळसा आयात करण्यात आला आहे.