मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील प्ले-ऑफ ‘ब‘ गटातील लीग सामन्यांत इंडियन ऍरोज आणि सुदेवा दिल्ली एफसी संघाने विजय नोंदविले. कोलकातात किशोर भारती क्रीडांगण मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंडियन ऍरोज संघाने ऐजॉल एफसी संघाचा 2-1 गोलानी पराभव केला.इंडियन ऍरोज संघासाठी प्रतीभ गोगोय व लालछानलिमा सायलोने तर ऐजॉल एफसीसाठी मालस्वामतलुंगाने गोल केले. विजयाच्या तीन गुणानी इंडियन ऍरोजचे 13 सामन्यांतून 10 तर ऐजॉल एफसीचे 12 सामन्यांतून 18 गुण झाले. कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुदेवा दिल्ली एफसीने विजयाची नोंद करताना नेरोका एफसी संघाचा एकमेव गोलने पराभव केला. सुदेवाच्या विजयी गोलाची नोंद गुरसिमरतसिंग गीलने केली. विजयाच्या तीन गुणानी सुदेवा दिल्ली एफसीचे आता 12 सामन्यांतून 15 तर नेरोका एफसीचे 13 सामन्यांतून केवळ 8 गुण झाले आहेत.
Next Article कुंभारजुवे-रामभूवनवाडा रस्ता बांधकामाचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.