वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी एनटीपीसीने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी गॅस ऍण्ड पॉवर लि.(आरजीपीपीएल)मधील गेलची हिस्सेदारी खरेदी करणार असून यासाठी करार करण्यात आला आहे. आरजीपीएलला दाभोळ प्रकल्पाच्या नावाने ओळखले जाते. या व्यवहाराला पूर्ण केल्यानंतर एनटीपीसीची आरजीपीएलमधील 86.49 टक्क्यांची हिस्सेदारी होणार असल्याचे संकेत आहेत.
या अगोदर जानेवारीमध्ये कंपनीने आरजीपीएलमध्ये 35.47 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. प्रारंभी एनटीपीसी आणि गेल या दोघांकडून दाभोळ प्रकल्पामध्ये 25.51 ते 25.51 टक्क्यांचे अधिग्रहण करण्यात आले होते. बीएसईला दिलेल्या माहितीनुसार एनटीपीसी लि. आरजीपीएलमधील एनटीपीसीची 14.82 टक्क्यांची हिस्सेदारी विकून 23 फेब्रुवारी 2021 रोजी गेल इंडियासोबत समभाग खरेदीसह करार केला आहे.