वेंगुर्ले (वार्ताहर)-
आरवली ग्रामपंचायतवतीने 14 व्या वित्त आयोग निधीतून युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी घेतलेल्या वाहन प्रशिक्षण लाभार्थींचे, प्रशिक्षण पूर्ण होताच देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चारचाकी 30 युवक वाहन चालकांना रेडी जिल्हा पाfरषद सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते सरपंच तातोबा कुडव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आरवली ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये लायसन्स वितरण करण्यात आले.
आरवली ग्रामपंचायतवतीने चौदावा वित्तीय आयोग निधीतून आरवली गावातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आरवली गावचे सरपंच तातोबा कुडव व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून वाहन चालक प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले, त्याप्रमाणे एकूण 30 इच्छुक बेरोजगार लाभार्थी यांना वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले. त्याप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आजच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 30 लाभार्थी यांना रेडी जिल्हा परीषद सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते आरवली ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये लायसन्स वितरण करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच सौ. रिमा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सौ.सायली कुडव, समीर कांबळी, सौ.शिला जाधव, किरण पालयेकर, प्रवीण मेस्त्री, सौ.वैशाली रेडकर, सौ.अक्षता नाईक आदींचा समावेश होता.
यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी आरवली ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे खास कौतुक केले. शासनाच्या निधीतून युवकांना स्वयंरोजगार कसा मिळेल. याचा अभ्यास करून हा उपक्रम राबविल्याबद्दल सरपंच, उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदनही केले.
या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार आरवली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विनय धाकोरकर यांनी मानले.