बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ला मेट्रो सुरु झाल्यांनतर प्रवाशांना प्रवास करताना आरोग्य सेतू अॅपचा वापर अनिवार्य करण्याचा प्रस्ताव होता का, याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.
सामान्य निवारक उपाय म्हणून कार्यालये आणि इतर कामाच्या ठिकाणी अॅपचा वापर अनिवार्य आहे का, हे स्पष्ट करण्यासाठी कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे. मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक आणि न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले आहेत. शहरातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने ही याचिका दाखल केली आहे.
तथापि आरोग्य सेतु अॅप वापरणे हाच पर्याय असल्याचे केंद्राने कोर्टाला आधीच स्पष्ट केले होते. विमान आणि रेल्वेने प्रवास करणे बंधनकारक नव्हते. बीएमआरसीएल मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी अॅप वापरणे अनिवार्य असून काही केंद्र सरकार व इतर कार्यालयांच्या कर्मचार्यांना व कामाच्या ठिकाणी ते अनिवार्य करण्यात आले आहे, असे याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सांगितले आहे.