मुंबई/प्रतिनिधी
मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असताना, या प्रकरणातील केंद्रबिंदू ठरलेल्या शाहरुख पुत्र आर्यन खानची आज देखील आर्थर रोड तुरुंगामधून सुटका झाली नाही. दरम्यान आर्यनला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला होता. पण कागद पात्रांच्या पूर्ततेअभावी आर्यनला आजची रात्र देखील तुरुंगामध्ये घालवावी लागणार आहे. उद्या सकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येणार आहे. तुरुंग अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाकडून काल आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं.