स्वतःचे प्रॉडक्शन हॉउस केले सादर, इटरनल सनशाइन प्रॉडक्शनची दाखविली झलक
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता निर्माती झाली आहे. तिने मुंबईत स्वतःचे प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. यासंबंधीची माहिती आलियाने स्वतः समाजमाध्यमांवरून देत स्वतःच्या प्रॉडक्शन कंपनीची काही छायाचित्रेही तिने प्रसारित केली आहेत. आलियाच्या छायाचित्रांमध्ये तिच्या प्रॉडक्शन हाउसचे नाव ‘इटरनल सनशाइन’ दिसून येते.
सुपर डुपर प्राउड
आलियाच्या पोस्टवर तिची आई सोनी राजदान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अभिनंदन, सुपर डुपर प्राउड’ असे नमूद केले आहे. याचबरोबर करण जौहर, अपूर्व मेहता, रकुलप्रीत सिंग यासारख्या कलाकारांनी आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाच्या प्रॉडक्शन हाउसचे कार्यालय मुंबईच्या जूह भागात आहे.
पहिल्या चित्रपटात शाहरुख
आलियाचा निर्माती म्हणून डार्लिंग्स हा पहिला चित्रपट ठरणार असून यात शाहरुख खान अभिनय करणार आहे. ‘महिलांचा अपमान तुमच्या प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकतो’ असा संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. जसमीत रीन या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.