नेटफ्लिक्सकडून स्ट्रीमिंग राइट्सची 80 कोटींमध्ये खरेदी
शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’चे स्ट्रीमिंग राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने 80 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. जसमीत रीन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटात आलिया, विजय शर्मा आणि शेफाली शाह मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. आलियाने शाहरुखसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आलियाचा हा चित्रपट एक डार्क कॉमेडी असून तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आई आणि मुलीच्या नात्याभोवती घुटमळणारी आहे. आलिया यात मुलीची तर शेफाली शाह तिच्या आईची भूमिका साकारत आहे. आलिया लवकरच राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत ‘आरआरआर’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर ती रणवीर सिंह, विक्की कौशल आणि जान्हवी कपूरसोबत तख्तमध्ये काम करत आहे.
रणवीर सिंहसोबत ती याचबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. तसेच दीर्घकाळापासून रखडलेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती रणवीर कपूरसोबत दिसणार आहे.