पणजीत नविन 10 कोरोना रुग्ण
प्रतिनिधी / पणजी
पणजी शहरात मंगळवारी नविन 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. आल्तिनो येथे 3 कोरोना रुग्ण, मळा परीसरात 3 कोरोना रुग्ण, करंझाळे, भाटान येथे 2 कोरोना रुग्ण, मिरामार येथील पापाजन हॉटेलजवळ व रायबंदर येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण सापडला आहे. अशी माहीती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
सध्या सापडलेल्या या सर्व भागातील तसेच आजुबाजुच्या भागातही मनपातर्फे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. आल्तीनो येथील मंगळवारी सकाळी एक 29 वर्षीय युवकाला कोरोनाने मरण आल्याने, तसेच या भागात आणखी तीघेजण कोरोना पॉझिटीव्ह सापडल्याने हा सर्व परीसर सिल करण्यात आला आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.
सुमारे 20 ते 22 घरे या भागातील पोलिस सरंक्षणात सिल करण्यात आली आहेत. जवळपास 130 लोक यामध्ये असून बुधवारी(आज) या सर्व लोकांची स्वॅब टेस्ट आल्तीनो येथेच करण्यात येणार आहे. तोपर्यंत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यातर्फे या लोकांना जिवनाश्यक वस्तु पुरविण्यात येणार आहे. सर्व अहवाल नेगेटीव्ह आल्यानंतरच सदर भाग मुक्त करण्यात येणार आहे. असे मडकईकर यांनी सांगितले.