प्रतिनिधी / वारणानगर
घराला कुलूप लावून सर्वजन शेतात काम करायला गेल्याचे पाहून बंद घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख पाच हजार असा ६० हजार ७७० रूपयाचा मुद्देमाल लांबवला. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून याबाबत हरी शंकर पाटील रा. आवळी ता. पन्हाळा यानी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
फिर्यादी हरी पाटील सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले ते परत १ वाजता आलेवर घराचे कुलूप तोडल्याचे,घरात पाहिलेवर कपाटाचे कुलूप तोडून तेथील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आलेवर कोडोली पोलीसांना कळवले.
घटनास्थळावर येवून पोलीसानी तपासाला सुरवात केलेवर फिर्यादी हरी पाटील यांच्या घरातील अज्ञात चोरट्याने दोन सोन्याचे चेन्स, तीन अंगठ्या, दोन टॉप्स, चांदीची जोडवी, तीन चांदीच्या कडी व रोख पाच हजार रुपये असा ६० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. अधिक तपास पो.ना. कोळेकर करीत आहेत.
दोन तासात चोरी
आवळी येथे फिर्यादी हरी पाटील ११ वा. घराला कुलूप लावून शेतात गेले ते १ वाजता परत आलेतर घरी चोरी झालेली अवघ्या दोन तासात चोरी झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.