प्रतिनिधी / बेळगाव :
आविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे संक्रांतीनिमित्त टिळकवाडी देशमुख रोडवरील सुभाष फोटो स्टुडिओच्या आवारात महिला उद्योजकांनी स्टॉल मांडले आहेत. या स्टॉलवर तिळगूळ, सुकामेवा, सणाला लागणारे अन्य पदार्थ तसेच तिळगुळाचे दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत.
आविष्कारच्या सदस्या अनिता दाभोळकर, विनिता नाईक, स्मिता गोखले, सुधा दलबंजन व धनश्री रेडकर यांनी हे स्टॉल मांडले आहेत. बेळगावकरांनी स्टॉलवरून खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अध्यक्षा मनीषा बदानी यांनी केले आहे. सदर स्टॉल सोमवार व मंगळवारीही सकाळी 11 ते 8 या वेळेत खुले आहेत.