उपतहसीलदार गोटेकर यांना दिले निवदेन, 29 रोजी आंदोलन छेडण्याचा निर्णय
बेळगाव \ प्रतिनिधी
देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या काळात डॉक्टर, पोलीस, नर्स याबरोबरच आशा कार्यकर्त्यां कोरोना योध्दा म्हणून सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. कोरोनाच्या संकट काळात स्वःताचा जीव धोक्मयात घालून काम करत असलेल्या आशा कार्यकर्त्यांना योग्य मानधन देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांना तातडीने दरमहा 12 हजार मानधन द्या, अशा मागणीचे निवेदन सोमवारी कर्नाटक राज्य आशा कार्यकर्त्यां संघातर्फे उपतहसीलदार गोटेकर यांच्याकडे देण्यात आले.
आशा कार्यकर्त्यां रात्रंदिवस कोरोना काळात सेवा बजावत आहे. मात्र त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. त्याबरोबर कोरोना योध्दय़ां म्हणून सेवा बजावत असणाऱया आशा कार्यकर्त्यांना पीपीई किट, मास्क, हातमोजे व इतर आवश्यक साहित्य पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी बुधवार दि. 29 जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा आशा कार्यकर्त्यांनी दिला आहे. याप्रसंगी गीता रायगोळ, मंगल हुंदरे, रेखा आनंदाचे, निंगव्वा राऊत, सरोजनी सकपाळे, शारदा अनगोळकर, ज्योती पाटील, कमल पाटील, लक्ष्मी झंगरूचे, रूपा कागणीकर, दिपा गिरी, रोहिणी कुंद आदी महिला उपस्थित होत्या.