वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशिया ऑलिम्पिक मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय क्रीडा क्षेत्रातील ओळखले जाणारे कुशल क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
आशिया ऑलिम्पिक मंडळाचे माजी अध्य़क्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांना जिनिव्हा न्यायालयाने गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरविल्याने त्यांना आपले पद सोडावे लागले.
1991 ते 2017 या 24 वर्षांच्या कालावधीत रणधीर सिंग हे अशिया ऑलिम्पिक मंडळाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. सध्या ते आशियाई ऑलिम्पिक समितीचे मानद उपाध्यक्षपद भूषवित होते. माजी अध्यक्ष अल सबाह यांनी आशियाई ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाकडे दिलेल्या लेखी पत्रामध्ये रणधीर सिंग यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा उल्लेख केला आहे. आशिया ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्षपद आपण काही कालावधीसाठी सोडत असून जिनिव्हा न्यायालयाच्या निर्णयावर आपण उच्च न्यायालयात अपील करण्यात असल्याचे अल सबाह यांनी सांगितले.