प्रतिनिधी / आष्टा
आष्टा येथे काल रात्रीच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी नागरिकांना दिसल्याने खळबळ उडाली. आष्टा ता. वाळवा येथील आष्टा पोलीस स्टेशन ते शिंदे चौक या रस्त्यावर बिबटयासदृश प्राणी नागरिकांना फिरताना दिसला. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले. सोमलिंग तळे, वग्यानी कॉलनी, पोलीस स्टेशन पाठीमागील हनुमान मंदिर, महिमान मळा या परिसरातील नागरिकांनी बिबट्या सदृश्य प्राणी पहिल्याची चर्चा आष्टा शहरात मोठ्या प्रमाणात आहे. आष्टा पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्याडून आष्टा व परिसरातील नागरिकांना घराबाहेर एकटे न पडण्याचे त्याचबरोबर रात्री झोपताना सुरक्षितता तपासून झोपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही नागरिकांच्या मते हा प्राणी बिबट्याच आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.