बेंगळूर/प्रतिनिधी
चामराजपेटचे आमदार बी झेड जमीर अहमद खान यांनी बुधवारी व्यावसायिक प्रशांत सांबरगी याच्याविरूद्ध कन्नड फिल्म ड्रग प्रकरणामध्ये संबंध जोडल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
खान यांनी सांबरगी यांनी केलेल्या आरोपामुळं अपमान आणि बदनामी झाल्याचे म्हंटले आहे. पोलीस उपायुक्त (पश्चिम) संजीव एम.पाटील यांच्या माहितीनुसार खान यांच्या तक्रारीनंतर चामराजपेट पोलिसांनी अज्ञात अहवाल (एनसीआर) नोंदविला आहे. एफआयआर नोंदविण्यास परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतील आणि त्यानुसार कारवाई करू, असे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
सांबरगी यांनी आमदार खान यांचे अभिनेता संजना गलराणी यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी मंगळवारी ड्रग्स प्रकरणी अटक केली होती.