लंडन आयर्लंड संघाविरूद्ध होणाऱया आगामी वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाच्या उपकर्णधारपदी अष्टपैलू मोईन अलीची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी मंगळवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने सराव शिबिरासाठी संघाची निवड केली.
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 जुलैपासून प्रारंभ होणार असून ही मालिका बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविली जाईल. इंग्लंडच्या कर्णधारपदी मॉर्गनची नियुक्ती करण्यात आली आहे.