फायजरच्या लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यावर ब्रिटन कोरोना महामारीवर लवकर नियंत्रण मिळविण्याची अपेक्षा करत होता. परंतु कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यावर तेथे धास्ती निर्माण झाली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक घेत स्थितीवर चर्चा केली आहे. विषाणूचा हा गूढ नवा प्रकार लंडन आणि इंग्लंडच्या दक्षिण हिस्स्यात अधिक प्रमाणात आढळून येत आहे. पंतप्रधान जॉन्सन लंडनमध्ये प्रवासबंदी लागू करण्याचा विचार करत आहेत. कोरोनाच्या या नव्या प्रकाराला वीयुआय-20201/01 नाव देण्यात आले आहे. विषाणूचे हे स्वरुप पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने महामारी फैलावत असल्याचे मानले जात आहे. केंट काउंटीच्या रुग्णालयांमध्ये बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लंडनमध्येही नव्या रुग्णांमध्ये मोठी भर पडली आहे. ब्रिटनमध्ये 23-27 डिसेंबरपर्यंत लोकांना नाताळ साजरा करण्याची अनुमती मिळणार होती. ख्रिसमस बबल अंतर्गत 3 कुटुंबे मिळून सण साजरा करू शकत होती.
Previous Article29 डिसेंबरला ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी?
Next Article अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.