व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
इंडोनेशियाहून बेळगावला आलेल्या तबलिगी जमातच्या दहा जणांवर अखेर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आले असून व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या संबंधीचा तपास हाती घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा प्रत्येकी एक याप्रमाणे दहा जणांवर 14(सी), फॉरेन ऍक्ट 1946 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार भारतात येण्यासाठी या दहा जणांनी पर्यटन व्हिसा मिळविला होता. 2 मार्च रोजीच ते इंडोनेशियातून नवी दिल्ली येथे पोहोचले. त्यानंतर निजामुद्दिन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत त्यांनी भाग घेतला.
2 ते 5 मार्चपर्यंत इंडोनेशियातील या दहा जणांनी मरकजमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर रेल्वेने ते बेळगावला आले. 6 मार्चला नवी दिल्ली येथून ते बेळगावकडे निघाले. 9 मार्च रोजी ते बेळगावला पोहोचले. त्यानंतर शहरातील वेगवेगळय़ा मशिदींमधून झालेल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आहे.
चांदू गल्ली आणि अमाननगरसह शहरातील वेगवेगळय़ा मशिदीत त्यांचे वास्तव्य होते. रामतीर्थनगर परिसरात पोहोचल्यानंतर याची खबर माळमारुती पोलिसांना मिळाली. तोपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. सध्या ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पर्यटन व्हिसावर भारतात आल्यानंतर त्यांनी पर्यटनस्थळांना भेटी द्यावयास हवे होते. तसे न करता दिल्लीपासून बेळगावपर्यंत तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सध्या सर्व दहा जणांच्या आरोग्यावर पोलीस व आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे.
मध्यवर्ती भागही धास्तावला आतापर्यंत जे सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत ते शहरापासून लांबचे आहेत. कॅम्प येथील तरुणाचा अपवाद वगळता बेळगुंदी, हिरेबागेवाडी आणि रायबाग तालुक्मयातील कुडची येथील चार जणांचा त्यामध्ये समावेश आहे. इंडोनेशियातून आलेल्या धर्मप्रचारकांनी शहरातील मध्यवर्ती भागातील मशिदीतही तीन ते चार दिवस मुक्काम ठोकल्याने मध्यवर्ती भागातही धास्ती वाढली आहे. सध्या या दहा विदेशींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नसली तरी आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले सर्व सातही जण निजामुद्दिन मरकजहून परतलेलेच आहेत. यासंबंधीची माहिती मिळताच आरोग्य व पोलीस यंत्रणांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही सिव्हिल हॉस्पिटलमधील फ्लू