वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरोत्तर वाढत असणाऱया किमती पेट्रोल व डिझेल वाहनांच्या विक्रीवर परिणाम करत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही काळामध्ये ग्राहकांनी पेट्रोल व डिझेलऐवजी सीएनजी इंधनावरील वाहनांना मागणी नोंदविली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये सीएनजीच्या वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे, असे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
काही नव्या शहरांमध्येही सीएनजीची वाहने लोकप्रिय होत आहेत. जून 2021 च्या मध्यापासून लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर मोटारींना मागणी हळूहळू का होईना वाढताना दिसते आहे. व्यावसायिक वाहनेही सीएनजीवर आधारित घेतली जात आहेत. दुचाकींचा विचार करता अजुनही ग्रामीण भागामध्ये परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे दुचाकींची मागणी बऱयापैकी बहरात नसल्याचे सिद्ध झाले आहे.