ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. कंपनीने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली. आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल दरात 31 पैसे वाढ झाली आहे.
यापूर्वी मंगळवारी 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. तर बुधवारी पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागले होते. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.
दिल्लीत पेट्रोल 90.99 रुपये तर डिझेल 81.42 रुपये इतके झाले आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल अनुक्रमे 91.14 रुपये, 97.34 रुपये आणि 92.90 रुपये इतके आहे. तर डिझेल 84.26, 88.49 आणि 86.35 रुपये इतके वाढले आहे.