वृत्तसंस्था /मेलबर्न
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन इरेल इडिंग्ज यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वार्षिक साधारण बैठक गुरूवारी आयोजित केली आहे. इडिंग्ज पुन्हा चेअरमनपदासाठी इच्छूक होते. पण त्यांना इतर सदस्यांचा पाठेंबा मिळत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी या बैठकीपूर्वी आपल्या राजीनामा दिला.
इडिंग्ज क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या चेअरमनपदी तीन वर्षे कार्यरत होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सदस्यांमध्ये नेहमीच मतभेद जाणवतात. इडिंग्ज पुन्हा चेअरमनपदासाठी इच्छूक होते. न्यू साऊथ वेल्सच्या सदस्यांनी इडिंग्ज यांची चेअरमनपदासाठी शिफारस केली. पण क्विन्सलँडने दोन दिवसापूर्वी इडिंग्ज यांचा पाठिंबा काढून घेतला. त्याचप्रमाणे पश्चिम ऑस्ट्रेलियाकडूनही इडिंग्ज यांना पाठिंबा नसल्याने इडिंग्ज यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे संचालक रिचर्ड प्रेडेनस्टेन यांची चेअरमनपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.