वृत्तसंस्था/ पॅरिस
इथिओपियाची महिला धावपटू लेटेसेनबेत गिडेने महिलांच्या 10,000 मी. शर्यतीत मंगळवारी नवा विश्वविक्रम नोंदवला. दोनच दिवसापूर्वी याच मैदानावर नेदरलँड्सच्या सिफान हसनने आधीचा विश्वविक्रम नोंदवला होता.
गिडेने नेदरलँड्समधील हेन्गेलो येथे आयोजित करण्यात आलेल्या इथिओपियाच्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत 20 मिनिटे 1.03 सेकंदाची नवी विश्वविक्रमी वेळ नोंदवली. गिडेच्या नावावर आता 5000 व 10000 मी. या दोन्ही शर्यतीचे विश्वविक्रम नोंद झाले असून असा पराक्रम करणारी ती नॉर्वेच्या इन्ग्रिड क्रिस्टियनसेननंतरची पहिली धावपटू आहे. इन्ग्रिडने 9186 ते 1993 या कालावधीत हा पराक्रम केला होता. धावपटूंची गती वाढविणाऱया वेव्हलाईट टेक्नॉलॉजीच्या मदतीने घेतलेल्या या शर्यतीत गिडेने आपली आधीची सर्वोत्तम कामगिरी (30ः21.23) तब्बल एक मिनिट 20.2 सेकंदाने मागे टाकली. ही कामगिरी तिने 2019 मध्ये दोहातील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नोंदवली होती.