प्रतिनिधी / बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावला डिस्ट्रीक चेअरमन ज्योती पाटील या बुधवार दि. 10 फेब्रुवारी रोजी भेट देणार आहेत. यावेळी बेळगाव इनरक्हील क्लबने केलेल्या विविध उपक्रमांची त्या पाहणी करणार आहेत.
त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
ज्योती पाटील मूळच्या नाशिकच्या. त्यांनी आपले प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथून घेतले. सरकारी महाविद्यालय मुंबई येथून दंत क्षेत्रातून पदवी प्राप्त केली. केएलई बेळगाव येथे एक वर्ष काम केल्यानंतर दांडेली येथे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. दांडेली क्लब येथे अनेक महत्त्वाची पदे भूषविली. 2015-16 मध्ये त्यांची डिस्ट्रीक एडिटरपदी, 2016-17 मध्ये जिल्हा सचिव 2017-18 मध्ये जिल्हा खजिनदार अशी पदे त्यांनी भूषविली. सध्या त्या डिस्ट्रीक चेअरमन आहेत. दांडेली येथील जिजामाता महिला मंडळाच्या त्या सल्लागार आहेत. भारतीय योग विद्याधाम दांडेलीच्या माजी अध्यक्षा असून दांडेली रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ. मोहन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांची पुष्कर व तन्मय ही दोन्ही मुले डॉक्टर आहेत.