प्रतिनिधी/ कराड
इनरव्हील क्लब ऑफ कराड ही संस्था वर्षी 31व्या वर्षात पदार्पण करत आहे. इनरव्हील क्लब ऑफ कराडचे 2020-21 हे नूतन वर्ष 1 जुलै 2020 या दिवशी सुरू होत असून या वर्षासाठी रुपाली डांगे यांची प्रेसिडेंट आणि सीमा पुरोहित यांची सेक्रेटरी या पदावर नियुक्ती करण्यात आली.
नवीन संचालक मंडळामध्ये ट्रेझरर- शीतल शहा, आयएसओ- मंजुषा इंगळे, व्हाईस प्रेसिडेंट- संगीता पालकर, जॉइंट सेक्रेटरी- वैशाली पालकर, एडिटर- रुता चाफेकर, सीसीसी- अर्चना औताडे, सीसी- प्रियांका कांबळे व मेंबरशिप डेव्हलपमेंट- श्रावणी घळसासी यांची नियुक्ती करण्यात आली.
क्लबचा सर्व सभासदांच्या सहकार्याने महिला व अनाथ मुलांसाठी व वृद्धांसाठी आरोग्य व स्वच्छता याविषयी ई कार्यशाळा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच कोविड-19 या महामारीच्या संकटात गरजूंना मदत करणे, जनजागृतीसाठी ऑनलाइन मार्गदर्शनपर व्याख्याने असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रेसिडेंट रुपाली डांगे आणि सेक्रेटरी सीमा पुरोहित यांचा मानस आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत कराड शहरातील व पंचक्रोशीतील अनेकांचे सहकार्य मिळते. तसेच ते यापुढेही मिळेल, अशी खात्रीही इनरव्हील क्लबच्या पदाधिकायांनी व्यक्त केली.