बेंगळूर
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या समभागांनी मंगळवारी शेअर बाजारात विक्रमी अंकांचा टप्पा पार केला आहे. सोबत सदरच्या कंपनीचे बाजार भांडवलही सर्वाधिक स्तरावर म्हणजेच 7 लाख 43 हजार 657 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कंपनीच्या समभागाचा भाव शेअर बाजारात मंगळवारी 1755.6 अंकांवर सर्वोच्च पातळीवर होता. 7 लाख कोटींचा टप्पा गाठणारी इन्फोसिस ही चौथी भारतीय कंपनी आहे.