प्रतिनिधी /बेळगाव
इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या बेळगाव शहरातील कार्यालयाचे सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ काकतीवेस येथे नूतन वास्तुत स्थलांतर झाले. मंगळवारी या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
याप्रसंगी डॉ. निरुपदी महास्वामीजी (आद्वीसिद्धेश्वर मठ मारेगुद्दी), लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्य प्रमुख पी. एस. रविकुमार, बेळगाव शाखा अधिकारी आर. जी. हलगली व लोकमान्य सोसायटीच्या विमा अधिकारी रेश्मा उपाध्ये उपस्थित होत्या.
सेवा देण्यास बांधिल आपल्या भाषणात राज्य प्रमुख रविकुमार यांनी ग्राहकांना सेवा देणे हे आमचे भाग्यच आहे. यापुढेही इफ्को टोकियो ग्राहकांना सेवा देण्यास बांधिल असून भविष्यातही उत्तम सेवा देण्याची ग्वाही दिली. अभिजित दीक्षित यांनी गेल्या आठ वर्षांपासून लोकमान्य सोसायटी व इफ्को टोकियो यांचे नाते कसे वृद्धींगत झाले याची माहिती देऊन इफ्को टोकियोकडून समाधानकारक सेवा मिळत असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी अनेक ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.