अमेरिका, कॅनडा, युरोपियन देशांचा आरोप
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
8 जानेवारी रोजी युक्रेनचे एक प्रवासी विमान इराणमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. मात्र तो अपघात नसून इराणनेच ते विमान पाडले, असा आरोप अमेरिका, कॅनडा व युरोपियन देशांनी केला आहे. विमानावर इराणने क्षेपणास्त्रे डागली आणि ते पाडले. जागतिक तणाव अधिक वाढविण्याचा तो प्रयत्न होता. या संबंधातील पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा कॅनडाने केला. मात्र इराणने हे आरोप नाकारले आहेत. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते सादर करावेत. त्यांवर विचार केला जाईल, असे इराणच्या प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिका-इराण संघर्षात या विमानातील 176 प्रवाशांचा बळी गेला. या विमानाचा चालक अनुभवी होता. तसेच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे.