प्रतिनिधी / बेळगाव
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांडने बेळगाव जि. पं. चे माजी अध्यक्ष इराण्णा कडाडी आणि बल्लारीचे भाजप प्रभारी अशोक गस्ती या दोघांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. सोमवारी सकाळी भाजप हायकमांडने इराण्णा कडाडी आणि अशोक गस्ती यांची नावे जाहीर केली आहेत.