बेळगाव : गो-पालनाचे व कृषीचे महत्त्व जनतेला समजावून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः गोवर्धन झाले होते. या घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) मध्ये दरवषी गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. यंदाही गेल्या शुक्रवारी गोवर्धन पूजा शेकडो भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त मुंबईच्या इस्कॉन चौपाटी मंदिराचे अध्यक्ष सनत्कुमार प्रभू व बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची प्रवचने झाली. महाराजांनी गोवर्धन पूजेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून कथन केले. सकाळी व सायंकाळी दीपदानाचा कार्यक्रम झाला. उपस्थित भक्तांसाठी महाप्रसाद झाला.
आज प्रभूपादांचा तिरोभाव दिन
इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा तिरोभाव दिन इस्कॉनमध्ये साजरा केला जातो. यंदाही हा कार्यक्रम सोमवार दि. 8 रोजी होत असून त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सनत्कुमार प्रभू यांचे प्रवचन होणार असून इतर भक्तांचीही प्रभुपाद यांच्याबद्दल विचार व्यक्त करणारी भाषणे होणार आहेत