इस्लामपूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे अनोख्या पध्दतीने बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून घोषणांच्या निनादात पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व पुतळ्यांना दुग्धाभिषेक करण्याची काल घोषणा केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,महिला जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, शहराध्यक्ष रोझा किणीकर,पदवीधर सरचिटणीस विशाल सूर्यवंशी,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी दिला.
नगरसेवक खंडेराव जाधव,विश्वनाथ डांगे,डॉ.संग्राम पाटील,पिरअली पुणेकर, सचिन कोळी, संजय जाधव,शैलजा जाधव,आयुब हवलदार,सागर चव्हाण, अंगराज पाटील, गोपाळ नागे,अभिजित रासकर,प्रशांत कदम,बाळासाहेब कोळेकर, राहुल सूर्यवंशी,रणजित तेवरे,रवी वाघमोडे, शकील जमादार,अन्सार हवलदार,राहुल नागे,जुबेर खाटीक, रहीमतुल्ला जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.