महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका व्याप्तीमधील मालमत्तांची नोंद ‘ई – आस्ती’ ऑनलाईन प्रणालीवर करण्यात येत आहे. सदर नोंदीसाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मालमत्तांची नोंद करण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे ई आस्ती नोंदीची फाईल यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणार आहे.
मालमत्तांचा कर भरण्यासाठी पीआयडी क्रमांक देऊन ऑनलाईन घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता मालमत्तांचा संपूर्ण तपशील ऑनलाईनवर नोंद करण्यासाठी ‘ई – आस्ती’ प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. सदर प्रणालीवर मालमत्तांची नोंद करण्याची सूचना नगर विकास खात्याने केली होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याने कर भरणा करताना मालमत्ताधारकांना अडचण होत आहे. त्यामुळे ‘ई – आस्ती’साठी कागदपत्रांची सक्ती मागे घेण्यात आली होती. कोरोनाच्या कालावधीत ‘ई – आस्ती’चे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता ‘ई – आस्ती’चे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून, ‘ई – आस्ती’वर नोंदीसाठी मालमत्तेचे खरेदीपत्र, इमारतीचे छायाचित्र, मालकाचे छायाचित्र, इमारत बांधकाम परवाना, आराखडा, सिटीएस उतारा, कर भरणा केलेली पावती, चेकबंदी त्याचप्रमाणे इतर कागदपत्रांची पुर्तता करावी लागत आहे. मात्र इमारत बांधकाम परवाना, इमारतीची लांबी रूंदी तसेच आराखडय़ाची चाचपणी करून ‘ई – आस्ती’ प्रणालीवर नोंद करण्यात येत आहे. पण सदर काम महसूल विभागाच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना करणे अशक्मय आहे. त्यामुळे ‘ई – आस्ती’ नोंदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची मदत घेण्यात येणार आहे. ‘ई – आस्ती’ नोंदीसाठी अर्ज केल्यानंतर सदर फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. मालमत्तेची लांबी – रूंदी व बांधकाम परवानगी, आराखडा, आदी तपशीलाची माहिती अचूक आहे का? याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पाहणी केल्यानंतरच ‘ई – आस्ती’वर नोंद करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे लॉग-ईन आयडी निर्माण करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली आहे. यापूर्वी स्वयंघोषित कर आकारणी नुसार मालमत्ताधारकांनी दिलेल्या तपशीलाच्या आधारे कर बसविण्यात येत होते. मात्र यापुढे मालमत्तांची अचुक माहिती तसेच व्यवस्थित तपशील आणि लांबी-रूंदी, चेकबंदीची नोंद करण्यात येणार आहे. तसेच मालमत्तेच्या उताऱयावर इमारतीचा किंवा मालमत्तेचे छायाचित्र व मालकाचे छायाचित्र असणार आहे. त्यामुळे अनधिकृत नोंदी करण्यास आळा बसणार आहे. मात्र ‘ई – आस्ती’च्या नोंदीची प्रक्रिया नागरिकांना त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे.