वार्ताहर / उगार खुर्द
उगार बुदुक रस्ता कोपरा ते बसस्थानक व बसस्थानक ते जुना उगार बुद्रुक या दोन्ही रस्त्यावरील अनेक वर्षांपासून दुकानांचे झालेले अतिक्रमण तहसीलदारांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले.
या दोन्ही रस्त्यावर एकूण 72 दुकानगाळे होते. बऱयाच वर्षांपासून सदर गाळय़ांचे अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू होते. अखेर कागवाडच्या तहसीलदार प्रमिला देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिरहट्टी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचाऱयांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले.
सदर गाळे काढत असताना अनेक व्यापाऱयांनी गाळे काढू नका, आमचे घर कसे चालणार, आमची ही उपजीविका असल्याची विनंती केली. पण अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने व्यावसायासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली. या संदर्भात न्यायालयात अनेक वर्षांपासून खटला सुरू होता. याचा निकाल शासनाच्या बाजूने लागल्याने तहसीलदार व नगरपरिषदेतर्फे अतिक्रमण झालेले गाळे काढून घ्यावेत अशी सूचना करण्यात आली होती. पण गाळे न काढल्याने प्रशासनाने तीन जेसीबीद्वारे गाळे काढण्यास भाग पडले. अतिक्रमण हटल्याने उगार बुद्रुक कोपरा ते बसस्थानक व उगार खुर्द बसस्थानक ते जुना उगार बुद्रुक रस्ता रुंद झाला आहे. अतिक्रमण हटविताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.