कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्हाधिकाऱयांकडून आदेश
वार्ताहर / उचगाव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सद्य स्थितीमध्ये कोरानाची साखळी रोखण्यासाठी उचगाव पंचक्रोशीतील जागृत मळेकरणी देवालयमध्ये सर्व भक्तांना दर्शन आणि यात्रा घेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार सोमवार दि. 19 एप्रिलपासून शासनाचा आदेश येईतोपर्यंत यात्रा दर्शन बंद ठेवण्यात आल्याची माहिती उचगाव येथील मळेकरणी देवस्थान देसाई भाऊबंद कमिटीने कळविले आहे.
सध्या देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर निर्बंध लावणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उचगाव येथील मळेकरणी देवालय हे एक जागृत देवस्थान असून संपूर्ण वर्षभर प्रत्येक आठवडय़ाच्या मंगळवारी व शुक्रवारी याठिकाणी बकऱयाचा बळी देऊन यात्रा केली जाते. या यात्रेमध्ये हजारो भाविक मंगळवारी, शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी आणि प्रसादासाठी उचगावला देवस्थानच्या आमराईत येत असतात. मात्र सध्या कोरोनाची सद्यस्थिती पाहता कोरोनाचा फैलाव उचगाव आणि परिसरात होऊ नये, संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. तरी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की सोमवार दि. 19 पासून कोणीही भाविक भक्तांनी आमराईमध्ये दर्शनासाठी अथवा यात्रेसाठी येऊ नये, अशी सर्वांना सूचना करण्यात आली आहे.