बेंगळूर : उडुपीतील प्रमुख आठ मठांपैकी एक असलेल्या शिरुर मठाच्या 31 व्या उत्तराधिकारीपदी 16 वर्षीय अनिरुद्ध सरळत्ताय यांची निवड करण्यात आली आहे. 13 मे रोजी संन्यास दीक्षा आणि 14 मे रोजी पट्टाभिषेक कार्यक्रम होणार आहे.
मध्वाचार्य यांनी स्थापन केलेल्या उडुपीतील आठ मठांपैकी शिरुर मठ एक आहे. यापुर्वी मठाधीश असणारे श्रीलक्ष्मीवरतीर्थ स्वामीजी यांचे 31 जुलै 2018 रेजी आजाराने देहावसान झाले होते. त्यामुळे रिक्त असणाऱया मठाधीशपदी बुधवारी अनिरुद्ध सरळत्ताय यांची निवड करण्यात आली. उडुपीतील सोदे मठाचे विश्ववल्लभतीर्थ स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. अनिरुद्ध यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून त्यांना कुटुंबीयांनी वैदीक शिक्षणाचे धडे दिले आहेत.