करिना कपूरची निर्मात्यांसमोर अट
करिना कपूर अलिकडेच स्वतःच्या दुसऱया पुत्राच्या नावावरून नेटिजन्सच्या ट्रोलिंगला बळी पडाली होती. करिनाने एका पुस्तकात स्वतःच्या दुसऱया पुत्राच्या नावाचा खुलासा केला आहे. करिनाने एका मुगल शासकाचे नाव स्वतःच्या मुलाला देणे चुकीचे असल्याचे नेटिजन्सचे म्हणणे आहे. याचदरम्यान करिना स्वतःच्या ओटीटी पदार्पणासाठी तयार असल्याचे समजते. तिचे चाहते करिनाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास आतुर आहेत.
अभिनेत्री देखील स्वतःच्या डिजिटल डेब्यूची तयारी करत आहे. तिला केवळ आता चांगल्या कथानकाची प्रतीक्षा आहे. मजेशीर असण्यासोबतच स्वतःच्या कंटेंटद्वारे लोकांना चकित करणारे कथानक तिला हवे आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा असल्याने डिजिटल स्पेसमध्ये काम करण्यास आतुर असल्याचे करिनाने म्हटले आहे.
ओटीटीशी संबंधित अनेक स्क्रिप्टस येत आहेत, पण रोमांचक आणि चकित करणाऱया प्रोजेक्टच्या मी शोधात असल्याचे तिने सांगितले आहे. करिना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात आमिर खानसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट नाताळाच्या दिनी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर करण जौहरच्या तख्त चित्रपटातही करिना काम करत आहे.