ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आले आहेत. त्यानंतर आता काही दिवस त्रिवेंद्र सिंह रावत हे दिल्लीतील आपल्या घरी आयसोलेटमध्ये राहणार आहेत.
दरम्यान, त्रिवेंद्र सिंह रावत यांना 18 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून ते आयसोलेटमध्ये होते. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी त्यांना थोडा ताप असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यामध्ये त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फिजिशियन डॉ. एन. एस. बिष्ट यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आले आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि मुलीची स्थिर आहे.