ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात रविवारी कोरोनामुळे 71 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 5 हजार 606 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 53 हजारचा टप्पा पार केला आहे. तर काल 2935 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 91 हजार 620 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 31 हजार 144 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 23,285 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 20,657 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 2580 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 628, नैनिताल 436, उधमसिंह नगर 567, टिहरी 248, चमोली 223 पिथोरागडमध्येे 94, पौडीमध्ये 234, बागेश्वर 34 आणि चंपावतमध्ये 173 , अल्मोडा 77, रुद्रप्रयाग 186 आणि उत्तरकाशीमध्ये 126 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 53,612 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 2802 ( 1.46 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.44 % इतके आहे. तर 282 झोन आहेत.