ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात काही प्रमाणात रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 264 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या दिवसात 345 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 28,671 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 55 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 24, हरिद्वारमध्ये 45, नैनिताल 12, उत्तरकाशीमध्ये 6, पौडीमध्ये 14, टिहरी 11, अल्मोडा 17, रुद्रप्रयाग 7 चमोली 8, चंपावत 26, पिथोरागडमध्येे 27 आणि बागेश्वर जिल्ह्यात 12 रुग्ण आढळून आले आहेत.
- प्रदेशात 3,471 रुग्णांवर उपचार सुरू
प्रदेशात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 38 हजार 066 इतकी झाली आहे. यातील 3 लाख 21 हजार 807 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.19 % इतके आहे. तर सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली असून 3,471 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 7,011 (2.07%) जणांचा मृत्यू झाला आहे.