- ॲक्टिव्ह रुग्णांनी ओलांडला 71 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात कोरोनामुळे 115 रुग्णांचा मृत्यू झाला. तर तब्बल 8 हजार 390 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 71 हजारचा टप्पा पार केला आहे. तर काल 4,771 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 38 हजार 383 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 58 हजार 903 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 34,937 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 30,930 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 3,430 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 812, नैनिताल 636, उधमसिंह नगर 1159, टिहरी 424, चमोली 175, पिथोरागडमध्येे 208, पौडीमध्ये 203, बागेश्वर 237 आणि चंपावतमध्ये 322, अल्मोडा 247, रुद्रप्रयाग 271 आणि उत्तरकाशीमध्ये 266 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 71,774 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 3548 ( 1.49 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.66 % इतके आहे. तर 300 झोन आहेत.