ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. गुरुवारी उत्तराखंडात 416 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 हजार 302 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 7305 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 1, बागेश्र्वर 9, चमोली 0, चंपावत 16, देहरादून 36, हरिद्वार 107, नैनिताल 15, पौरी गरवाल 5, पिथोरगड 0, रुद्र प्रयाग 4,तेहरी गरवाल 16, यू एस नगरमधील 192 आणि उत्तर काशीमधील 15 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 11,302 रुग्णांपैकी आतापर्यंत 7014 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.12 टक्के इतके आहे. तर सध्या 4,103 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.