- आज देखील अभियान राहणार सुरू
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी देखील कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. तर प्रदेशात काल देखील लसीकरण अभियान सुरळीत पार पडले.
सोमवारी 37 केंद्रावर 3037 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 1961 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण 64.57 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती.
याबाबत अधिक माहिती देताना, आरोग्य सचिव अमित सिंह नेगी यांनी सांगितले की, लसीकरण मोहीम योग्य रीतीने सुरू आहे. प्रदेशात आतापर्यंत या लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाही आहेत. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही नेगी यांनी यावेळी केले आहे.