ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील उच्च शिक्षण संस्था 15 डिसेंबरपासून सुरू केल्या जाणार आहेत. हा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीआधी स्व. माजी आमदार अनसुइया प्रसाद मैखुरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यानुसार, राज्यातील उच्च शिक्षण संस्था येत्या 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. यासोबत कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील सर्व शिक्षण संस्था बंदच आहेत. राज्य सरकारने 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, उच्च शिकण सस्थांबाबत अजून निर्णय घेतला नव्हता. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे रिपोर्ट आज बैठकीत सादर केल्यानंतर आज निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच कोविड 19 लसी बाबत देखील बैठकीत प्रेझेंटेशन सादर केले. पहिल्या टप्प्यात 20% लोकांना उत्तरप्रदेशात लस दिली जाणार आहे. यामध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आणि कोरोना काळात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस दिली जाणार आहे.