ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल आनंद सिंह बिष्त यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळाने ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या टीम 11 बरोबर बैठक करत होते. निरोप मिळाल्यावर देखील त्यांनी काम सुरू ठेवले मात्र, त्यांचे डोळे पाणावले होते.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करत त्यांच्या अंतिम संस्कारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या परिवाराला देखील लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करत कमी लोकांना बरोबर घेऊन अंतिम संस्कार पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यांनी या कठीण परिस्थितीत, दुःखाच्या प्रसंगी आपल्या आईसाठी एक भाऊक पत्र देखील लिहिले आहे.