प्रतिनिधी /पणजी
कन्वेयर बेल्ट उत्पादनात स्वतःचे ’गोल्बल’ हे नाव खऱया अर्थाने सार्थकी लावणारी जागतिक दर्जाची कंपनी गोव्यात कार्यरत झाली आहे. कन्वेयरशी संबंधित कोणतीही समस्या असो तिचे समाधान केवळ ग्लोबलच करू शकेल अशी स्वतःची मक्तेदारीच या कंपनीने प्रस्थापित केली आहे. त्यामुळेच देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अन्य कित्येक देशातील मोठमोठय़ा कंपन्यांना कन्वेयर यंत्रणा आणि संबंधित सर्व समस्यांसाठी ग्लोबलच आधार ठरू लागली आहे.
आजपर्यंत ज्या कंपन्यांना कन्वेयरसाठी रबर बेल्ट व मेटल रोलर याच पारंपरिक पद्धतीवर अवलंबून रहावे लागत होते त्यांना आता ग्लोबलच्या रुपाने नवे तंत्रज्ञान लाभले आहे. खत, मीठ, कोळसा, ऍश, खनिज, नायट्रोजन, पॉटेश, सल्फर, यासारखी केमिकल्स, आदींचे उत्पादन व हाताळणी करणाऱया जगातील सर्वात मोठय़ा कंपन्या ग्लोबलच्या ग्राहक आहेत. सुमारे 15 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांसाठी स्वामित्व हक्क (पेटंट) सुद्धा प्राप्त केले आहेत.
दोनापावला येथे आंतरराष्ट्रीय सेंटरमध्ये आयोजित वाणिज्य उत्सव प्रदर्शनात स्वतःचा स्टॉल थाटलेल्या या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रणेश धोंड, तांत्रिक संचालक विश्राम धोंड आणि कार्यकारी संचालक सचिन भंडारे यांच्याशी बातचित करण्याची संधी मिळाली.
सतत नाविन्याची कास धरल्यामुळे आमचे अनेक प्रयोग यशस्वी झाले. त्यातून कित्येक उत्पादनांसाठी आम्ही पेटंट सुद्धा प्राप्त केले, असे धोंड यांनी सांगितले. इफ्को, टाटा केमिकल्स, निरमा, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अदानी, यांच्यासह जगातील सर्वात मोठा मीठ उत्पादक प्रकल्प असलेली नामिबियातील कंपनी, जॉर्डनमधील खत उत्पादक कंपनी, मेक्झिकोतील फर्डिनार ही सर्वाधिक खत उत्पादक कंपनी, त्याशिवाय कतार, दक्षिण आफ्रिका, रशिया, पॅनडा, नॉर्वे, यासारख्या देशांमधील असंख्य कंपन्यांना आम्ही उत्पादने पुरविली आहेत. त्यातील काही प्रकल्पात तब्बल 20 ते 25 कि.मी. लांबी, 2 ते 2.5 मीटर रुंदीचे सुद्धा पाच ते सहा कन्वेयर आहेत. गोव्यातील एमपीटीसह जवळजवळ सर्व खनिज उत्पादक कंपन्यांना आम्ही कन्वेयर बसविले होते, असे धोंड यांनी सांगितले.
एचपीपीई या विशेष रसायनातून निर्मित या उत्पादनांची कार्यक्षमता प्रचंड असून तब्बल पाच वर्षेपर्यंत कोणत्याही दुरुस्ती देखभालीशिवाय ती चालू शकतात. त्याच्या उत्पादनासाठी लागणारी विशेष यंत्रणा स्वतःच्या गरजेनुसार डिझाईन करून रशियामधून उत्पादित करून आणण्यात आली. 2005 मध्ये ग्लोबल कन्वेयर सिस्टम्स् नावाने सांकवाळ औद्योगिक वसाहतीत प्रकल्प स्थापन करण्यात आला. त्यात 82 टक्के कर्मचारी गोमंतकीय आहेत. जगातील अनेक देशांमध्ये आयोजित अशाप्रकारच्या प्रदर्शनात आम्ही सहभाग घेतला असून लवकरच रशियामध्ये प्रदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.